पुणे : आम्हाला तृतीयपंथी म्हणून नाही, तर माणूस म्हणून स्वीकारा’ | पुढारी

पुणे : आम्हाला तृतीयपंथी म्हणून नाही, तर माणूस म्हणून स्वीकारा’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आम्हाला तृतीयपंथी म्हणून नाही, तर माणूस म्हणून स्वीकारण्याची गरज आहे, असा सूर ‘तृतीयपंथींचा लोकशाहीतील सहभाग’ या राज्यस्तरीय परिषदेतून उमटला. अन्य व्यक्तींप्रमाणे आमचीही ओळख आमच्या कामाने, आमच्या शिक्षणाने, आमच्या कौशल्याने व्हायला हवी. मात्र, ती आमच्या लिंगाने होताना दिसते, अशी खंत परिसंवादामध्ये काहींनी व्यक्त केली.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथींचा लोकशाहीतील सहभाग’ या दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एलजीबीटीआयक्यू प्लस’ अर्थ आणि फरक या विषयावर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. दुसर्‍या सत्रात करिअरमध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथींचा संवाद, तर तिसर्‍या सत्रात तृतीयपंथींचे शिक्षण आणि रोजगार, या विषयावर सखोल  चर्चा करण्यात आली.

परिषदेत मांडलेले मुद्दे
आमच्यातील प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्यांना प्रशिक्षण मिळावे
तृतीयपंथींचे विद्यापीठात अध्यासन असावे
आमच्या निवारा, शिक्षण, रोजगार, मूलभूत प्रश्नांवर काम होणे गरजेचे
लहानपणापासूनच मुलांच्या पाठ्यपुस्तकात या विषयावर जनजागृती आवश्यक
जन्माच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रे मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर व्हाव्यात
प्रत्येक जिल्ह्याला तृतीयपंथी संरक्षण केंद्र असावे

तृतीयपंथीयांची ओळख कौशल्य आणि शिक्षणाच्या आधारावर होण्याची अपेक्षा

 

Back to top button