गडचिरोली : वाघाने घेतला आणखी एक बळी; उसेगाव जंगलातील घटना | पुढारी

गडचिरोली : वाघाने घेतला आणखी एक बळी; उसेगाव जंगलातील घटना

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : मशरूम गोळा करण्यासाठी जंगलात गेलेला तरुण वाघाच्‍या हल्‍ल्‍यात ठार झाला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव नजीक ही घटना घडली. प्रेमपाल तुकाराम प्रधान (४५) रा. उसेगाव असे मृताचे नाव आहे.विशेष म्हणजे कालच या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून विशेष पथक या परिसरात दाखल झाले होते. याच वाघाने आणखी एक बळी घेतला आहे.

देसाईगंज व आरमोरी तालुक्यात सध्या सीटी एक या वाघाचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई केली आहे. असे असतानाही प्रेमपाल हा एका मित्रासह आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात मशरूम गोळा करण्यासाठी गेला होता. जवळच दबा धरून बसलेल्या सीटी १ या वाघाने प्रेमपालवर हल्ला करून त्यास ठार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button