कल्याण : उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू | पुढारी

कल्याण : उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : पावशेपाडा येथील सेंच्युरी हायस्कूलचा विद्यार्थी पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. सूर्यदेव यादव (वय १४, रा. धोबीघाट) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. सूर्यदेव हा त्याचा वर्गमित्र आयर्न शर्मा याच्याबरोबर शाळेत जात असल्याचे सांगून थेट पावशेपाडा येथील उल्हासनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता.

दरम्यान नदीच्या पात्रामध्ये उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून जाऊ लागला त्याचा मित्र शर्मा याने वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला वाचवण्यात यश आले नाही. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांचा मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. दुपारी ३ च्या दरम्यान सूर्यदेवचा मृतदेह नदीच्या पात्रातुन बाहेर काढण्यात आला. पुढील तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button