Hemant Soren Disqualified : हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द, निवडणूक आयोग जारी करणार अधिसूचना | पुढारी

Hemant Soren Disqualified : हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द, निवडणूक आयोग जारी करणार अधिसूचना

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hemant Soren Disqualified : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणात निवडणूक आयोगानंतर राज्यपालांनीही आपला निर्णय दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे. बरहैत विधानसभा मतदारसंघातील झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) आमदार हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राज्यपाल याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगासह राज्य निवडणूक आयोगाला देतील. त्यानंतर निवडणूक आयोग अधिसूचना जारी करेल.

गेल्या दोन दिवसापासून राजकीय गदारोळ..

झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍यावर मुख्‍यमंत्रीपदाचा गैरवापर केल्‍याचा आरोप आहे. मुख्‍यमंत्री असतानाही त्‍यांच्‍या नावावर कोळसा खाणी असल्‍याचा आरोप आहे. याप्रकरणी सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करावे का, याबाबत राज्‍यपालांनी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवले होते. निवडणूक आयोगाने काला (दि. २५) आपला अहवाल सादर केला. त्यात निवडणूक आयोगाने सोरेन यांचे सदस्‍यत्‍व रद्‍द करण्‍याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. याच अहवालाच्या आधारे आज (दि. २६) राज्यपाल रमेश बैस यांनी निर्णय घेतला असून त्यांनी हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे, असे वृत्त समोर येत आहे. (Hemant Soren Disqualified)

प्रतिनिधित्‍व अधिनियम कलम ९ (अ) नुसार मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍यावरील आरोप गंभीर आहेत. मुख्‍यमंत्रीपदावर असतानाही त्‍यांच्‍या नावावर कोळसा खाणी असल्‍याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाला या आरोपांमध्‍ये तथ्‍य आढळल्‍यानेच त्‍यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करण्‍याची शिफारस करण्‍यात आयाचे समजते आहे. तसेच भ्रष्‍टाचार प्रकरणी हेमंत सोरेन दोषी आढळल्‍यास त्‍यांना पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही, असेही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. (Hemant Soren Disqualified)

Back to top button