मध्य प्रदेशात तरुणाने गर्दीत फोडला बॉम्ब; २ ठार, १५ जखमी | पुढारी

मध्य प्रदेशात तरुणाने गर्दीत फोडला बॉम्ब; २ ठार, १५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर एका तरूणाने बॉम्ब फोडला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना रविवारी रात्री इंदूरमधील बडगोंड पोलीस स्टेशन हद्दीतील बर्छा भागात घडली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महू तहसीलच्या बरगोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील बेरछा गावात १५ ऑगस्टची तयारी सुरू होती. यावेळी दोन गटामध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटातील तरुण आमनेसामने आल्याने वातावरण तंग झाले. यावेळी नागरिकांनीची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी एक तरुण बॉम्ब घेऊन घटनास्थळी आला. आणि त्याने गर्दीत जाऊन बॉम्ब फोडला. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या गावातही घबराट पसरली आहे. या घटनेदरम्यान बॉम्बचा स्फोट करणारा तरुणही ठार झाल्याचे सांगितले जात   आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button