पात्रता नसेल म्हणून मला मंत्रीपद दिले नाही; पंकजा मुंडेचा टोला | पुढारी

पात्रता नसेल म्हणून मला मंत्रीपद दिले नाही; पंकजा मुंडेचा टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गटाच्या ९ तर भाजपच्या ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे या मंत्र्याच्या शपथविधीला गैरहजर राहिल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझी मंत्रिपदासाठी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल, असा टोला पंकजा मुंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला.

पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यानंतर त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्ती केली.
शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेल्या स्थान देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिला असल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रियाही यावेळी पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्रीमंडळचा विस्ताराने सर्वचं समाधानी असतील असे नाही. त्यामुळे ज्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी नवनिर्वाचीत मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button