जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा | पुढारी

जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळमध्ये अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडित यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणी तब्बल तीन दिवसानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयीत म्हणून माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, मुकेश भालेराव यांच्यासह चार जणांचा समावेश आहे.

तक्रारदार अजयसिंग याच्या मित्राचे हर्षल राणे यांच्याकडे फर्निचरचे एकूण ३० हजार रुपये घेणे बाकी होते. त्यामुळे अजयसिंगला हर्षलसोबत संवाद साधण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी हर्षल राणे याने चाकूने अजयसिंगच्या उजव्या पाठीवर वार केले. तर मुकेश भालेराव याने पिस्तूलाच्या उलट्या बाजूने वार केला. तसेच भरत याने दगडाने व लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी यापूर्वी देखील जीवे ठार मारण्याची अगोदरच धमकी दिल्यावरून हा चाकूहल्ला झाला. याप्रकरणी चौघांविरोधात अजयसिंग यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गजानन पघडण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button