फुलाला सुगंध मातीचा : कीर्तीला करावी लागली तारेवरची कसरत | पुढारी

फुलाला सुगंध मातीचा : कीर्तीला करावी लागली तारेवरची कसरत

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेत सध्या कीर्तीची नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं कीर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेताना कीर्तीने याआधी आपलं शौर्य दाखवलंच आहे. खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना कीर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत. नोकरी आणि घरची जबाबदारी पार पडताना सध्या तिचा कस लागतोय. हाच प्रसंग प्रोमोमधून दाखवण्यासाठी यावेळी कीर्तीला असाच एक धाडसी प्रसंग शूट करावा लागला ज्यात ती दोरीवरुन चालतेय.

कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान होतं. फाईट मास्टर आणि मालिकेची संपूर्ण टीम जरी सोबत असली तरी समृद्धीने दोरीवर चालण्याचं हे कसब आत्मसात केलं. दोन-तीन वेळा सराव केल्यानंतर समृद्धीने अपेक्षित असलेला शॉट दिला आणि सेटवर सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं.

गेले दोन वर्ष समृद्धी कीर्ती ही व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीये तर ती जगतेय. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी नवी आव्हान उभी ठाकतात समृद्धी त्याचा हसत हसत सामना करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samruddhi Kelkar (@samruddhi.kelkar)

Back to top button