निपाणीत 11 टक्के लोकांनाच ‘बूस्टर डोस’ | पुढारी

निपाणीत 11 टक्के लोकांनाच ‘बूस्टर डोस’

निपाणी; राजेश शेडगे :  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली. या उपक्रमाचा प्रारंभ 15 जुलैपासून करण्यात आला तरी महात्मा गांधी हॉस्पिटल व शहर प्राथमिक आरोग्य केंद्र आंदोलन नगर येथे बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. केवळ 11 टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतल्याचे दिसून आले आहे.

निपाणीत कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. सहा महिन्यांपूर्वी दुसरा डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घेण्यासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये यावे असे आवाहन डॉ. सीमा गुंजाळ व डॉ. गणेश चौगुले यांनी केले आहे. निपाणी तालुक्यात 11 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

निपाणी तालुक्यात 18 वर्षांवरील 2 लाख 17 हजार 719 नागरिक लाभार्थी असून निपाणी शहरात 47 हजार 461 नागरिक लाभार्थी आहेत. निपाणी तालुक्यात 12 ते 14 वयोगटातील सर्व मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 15 ते 17 वयोगटातील मुलांनी पहिला डोस 92 टक्के तर दुसरा डोस 91 टक्के, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी पहिला डोस 86 टक्के तर दुसरा डोस 88 टक्के, 45 ते 59 वयोगटातील नागरिक, 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनीही दोन्ही डोस घेतले आहेत. 60 वर्षांवरील 84 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

निपाणी तालुक्यात 18 वर्षांवरील 2 लाख 17 हजार 719 पैकी 2 लाख 12 हजार 988 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण 98 टक्के इतके आहे. 2 लाख 12 हजार 696 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण 96 टक्के इतके आहे. बूस्टर डोस फक्त 2 टक्के नागरिकांनी घेतला आहे. निपाणी शहराची लोकसंख्या 65 हजार 15 इतकी आहे. त्यापैकी 47 हजार 461 नागरिकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. यापैकी 45 हजार 889 जणांनी पहिला तर 45 हजार 113 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

बूस्टर डोस फक्त 9 टक्के लोकांनी घेतला आहे.
अकोळ येथे 22,306 पैकी 19,333 जणांनी पहिला, 20040 नागरिकांनी दुसरा, बेडकिहाळ येथे 20399 जणांपैकी 18751 जणांनी पहिला तर 20112 नागरिकांनी दुसरा डोस, बेनाडीत 25851नागरिकांपैकी 25729 जणांनी पहिला, 26421 जणांनी दुसरा, बोरगावात 16690 नागरिकांपैकी 17072 जणांनी पहिला तर 17,404 जणांनी दुसरा, गळतगा येथे 18328 जणांनी पहिला, 19204 जणांनी दुसरा, कारदगा केंद्रावर 17256 जणांनी पहिला तर 19630 जणांनी दुसरा, माणकापुरात 11589 नागरिकांनी पहिला तर 11575 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मांगुर केंद्रावर 14019 नागरिकांपैकी 14827 नागरिकांनी पहिला तर 15660 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सौंदलगा केंद्रावर 26340 नागरिकांपैकी 24360 नागरिकांनी पहिला तर 23573 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Back to top button