४० आमदार असलेला व्यक्ती मुख्यमंत्री होतो, यात काहीतरी काळंबेरं : अजित पवार | पुढारी

४० आमदार असलेला व्यक्ती मुख्यमंत्री होतो, यात काहीतरी काळंबेरं : अजित पवार

मुबंई : पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना फोडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, त्यानंतर एकही आमदार निवडून आलेला नाही, अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना संकेत दिले. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेला नाही. गेल्या मंत्रिमंडळात शिंदेंना एकच मंत्रालय का? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. १०६ आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. पण, ४० आमदार असलेला व्यक्ती मुख्यमंत्री होतो, यात काही काळंबेरं आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

शिंदे सर्वगुणसंपन्न असतील तर केवळ एकचं खातं का?, १२ आमदारांना मान्यता देताना दिरंगाई का केली? राज्यपाल अचानक ॲक्शन मोडमध्ये कसे काय आले? अध्यक्षाची निवड करतानाही विलंब का लावला? कोर्टात प्रकरण पेडिंग तरीही विश्वासदर्शक ठराव का घेतलं?, असे अनेक सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केले.

शिवसेना फोडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, त्यानंतर एकही आमदार निवडून आलेला नाही. सुरत-गुवाहाटी-गोवा आमदारांचं इतकं पर्यटन झालं. काही आमदार टेबलावर नाचायला लागले, हे चुकीचे आहे. सूरतला जाण्याआधी सत्तार दोन तास चर्चा करून गेले. पण ते सुरतला जाण्याची कुणकुणही लागली नाही, असे पवार यांनी नमूद केले.

यावेळी पवार यांनी शहाजीबापूंची नक्कल करून दाखवली. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके ओके …’ यावर पवार म्हणाले- काय ओके बापू? आपण एकत्र काम केले. शहाजीबापू जरा सांभाळून, बाकीचे जातील सोडून, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी पवार यांनी मिश्किलपणे दीपक केसरकर आणि शिंदेंचं कौतुक केलं.

Back to top button