दौंडमध्ये स्वच्छतागृहे उभारा; ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मागणी | पुढारी

दौंडमध्ये स्वच्छतागृहे उभारा; ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मागणी

दौंड : पुढारी वृत्तसेवा: दौंड शहरातील स्वच्छतागृहे नगरपालिकेने चार वर्षांपूर्वी काढून टाकली. त्या जागी दुसरी स्वच्छतागृहे बांधली नसल्याने शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न जिकिरीचा झाला आहे. अनेक नागरिकांनी बर्‍याच वेळा मागणी करूनदेखील शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे दौंड नगरपालिकेने बांधलेली नाहीत.

दौंड नगरपालिकेने शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत, असे निवेदन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने देण्यात आले आहे. भाजी मंडई, जुन्या हिंद टॉकीजजवळ असलेली स्वच्छतागृहे ही कुठेही कोणाला अडथळा ठरत नव्हती, तसेच पोलिस स्टेशनलगत असलेले स्वच्छतागृहदेखील हलविले व ती जागाच कचराकुंडीने घेतली आहे. नगरपालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे दौंड शहरातील व शहरात आलेल्या बाहेरगावाहून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Back to top button