पिंपरी : कांद्याची आवक घटल्याने दरात वाढ | पुढारी

पिंपरी : कांद्याची आवक घटल्याने दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी भाजी मंडई व मोशी येथील उपबाजार समितीमध्ये रविवारी पावसामुळे गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांची आवक कमी झाली होती. विशेषत: कांद्याची आवकही कमी झाली असल्याने दरात केवळ दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर होते.

कांद्याची आवक 32 क्विंटलने घटली असून, रविवारी 342 क्विंटल आवक झाली. बटाट्याची आवक 367 क्विंटल ऐवढी झाली होती. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात 230 क्विंटलने आवक वाढली होती. लिंबांची आवक कमी झाली असल्याचे दिसून आले. तर, टोमॅटोची 373 व काकडीची 119 क्विंटल आवक झाली होती. 35 ते 40 रुपये किलो दराने काकडी मिळत होती. फळभाज्यांची आवक 2343 क्विंटल तर पालेभाज्यांची 43 हजार 800 गड्ड्यांची आवक झाली होती.

Back to top button