Lok Sabha Election 2024 : मध्यप्रदेशात ‘महाराजा’ आणि मामांच्या भाग्याचा फैसला होणार

Lok Sabha Election 2024 : मध्यप्रदेशात ‘महाराजा’ आणि मामांच्या भाग्याचा फैसला होणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात मध्य प्रदेशात राजा, महाराजा आणि राजकारणात "मामा" म्हणून लोकप्रिय असलेल्या दिग्गज नेत्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामध्ये दोन माजी मुख्यमंत्री आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश आहे.

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर- चंबल क्षेत्रातील ९ जागांवर ७ मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुमारे २० वर्षानंतर या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. शिवराजसिंह चौहान राजकारणात 'मामा' या उपाधीने लोकप्रिय आहेत.

माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह रायगड या आपल्या पारंपारिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. राजकारणात "राजा साहब" उर्फ "दिग्गीराजा" म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तब्बल ३० वर्षानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

"महाराज" अशी ख्याती असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गुना—शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

गेल्या निवडणुकीत मध्यप्रदेशच्या सर्व ९ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार करून आपली शक्ती पणाला लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुरैना, बैतूल आणि राजगडसह इतर ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका वधेरा यांनी प्रचार रॅली, सभा घेऊन काँग्रेसच्या बाजूने वातावरण वळविण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news