दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना मदत; राष्ट्रीय डॉक्टरदिनी स्पंदन संस्थेचा अनोखा उपक्रम | पुढारी

दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना मदत; राष्ट्रीय डॉक्टरदिनी स्पंदन संस्थेचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय डॉक्टरदिनी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एका डॉक्टराच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. स्पंदन सामाजिक संस्थेने दाखवलेल्या औदार्याची प्रशंसा होत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर)सह पुणे- नगर महामार्गावरील प्रत्येक गावांमध्ये स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक कार्य केले जाते. नुकताच राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा केला. यावेळी काही दिवसांपूर्वी निधन पावलेले डॉ. कमलाकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी स्पंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, उपाध्यक्ष डॉ. रामदास देवखिळे, सचिव डॉ. श्री. अनंता परदेशी, खजिनदार डॉ. गणेश भोसले आदी उपस्थित होते. डॉक्टर दिनानिमित्त डॉ. शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया पालीमकर व डॉ. आनंद पालीमकर यांच्या हस्ते ज्येष्ठ डॉ. एल. के. कदम यांना स्पंदन भूषण पुरस्कार देण्यात आला. पुढील काळातही सामाजिक कामे केली जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.

 

Back to top button