हिंगोली : शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी विजय | पुढारी

हिंगोली : शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी विजय

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पतसंस्था मर्यादित आखाडा बाळापूर या संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. १५ पैकी १४ जागेवर सहकार पॅनलने विजय मिळविला. तर एकता पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली.

मागील निवडणुकीत सहकार पॅनेलला ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिक्षक नेते व्ही. एस. सूर्यवंशी यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून शिक्षक पतसंस्थेवर एक हाती सत्ता मिळवली. तर मागच्या वेळी नागरगोजे यांच्या अधिपत्याखाली पतपेढी होती. यावेळी त्यांची केवळ एकच जागा निवडून आणता आली आहे.

सहकार पॅनेलचे नेतृत्व करणारे शिक्षक नेते व्ही. एस. सूर्यवंशी यांच्यासोबत डी. एस. कोले, रमेश सूर्यवंशी, बाळासाहेब पतंगे, सुरेश पांचाळ, संजय कुमार, अशोकराव देशमुख यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. सहकार पॅनलचे १४ सभासद निवडून जरी आले असले, तरी सर्वात जास्त चर्चा ही एका पराजित उमेदवाराची झाली. गणेश गोडे हे अगदी बोटावर मोजण्याइतक्या मताने पराभूत झाल्याने त्यांच्या निसटत्या पराभवाची चर्चा सुरू झाली आहे.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

उडगे राजकुमार, विश्वनाथ सोपान कदम, देशमुख प्रताप राव, नागरगोजे पंडित, गोविंदराव निळकंठ, हनुमान विठ्ठल पानपट्टे, रमेश पांडुरंग पोटे, गणपत पिराजी फुले, कुंडलिक श्रावण बेद्रे, भगवान नागोराव माकणे, भगवान लिंबाजी इतर मागासवर्गीयमध्ये सुरेश राजाराम पांचाळ, महिला राखीव आमले शांताबाई, गणाजी देशमुख, सुनिता बापूराव, अनुसूचित जाती आणि जमातीचे रणवीर जयकुमार कोंडवा तसेच भटक्या विमुक्त जाती जमातीचे चव्हाण रमेश, सुरत राम तर सहकार पॅनलचे एकमेव पराभूत उमेदवार गणेश गोडे.

एकता पॅनलचे पराभूत उमेदवार

दीपक गट, कदम गणेश, खरोडे विठ्ठल सटवा, डुकरे माधव, रानोजी ढोकणे, सखाराम बिराजदार, धनराज बाळू किसन, सावंत जगन्नाथ गणपतराव, सावंत संजय बळीराम इतर मागासवर्गीयमध्ये विनोद सातव, महिला राखीव धाबे बी पुंडलिक, व सुमन काळूराम, अनुसूचित जाती जमातीचे रणवीर सटवा, व विमुक्त भटक्या जमातीचे बद्दू सिंग हिरामण.

हेही वाचलंत का? 

Back to top button