Friendship Marriage
Friendship Marriage

ना शारीरिक संबंध ना प्रेम…! जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे ‘फ्रेंडशिप मॅरेज’?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन असे म्हटले जाते. लग्नाच्या या जुन्या संकल्पनेत वारंवार बदल होत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप हा देखील असाच एक बदल आहे. ज्यामध्ये लग्न करण्याची गरज नाही पण ते पती-पत्नीसारखे राहतात. आता लग्नाचा आणखी एक नवीन ट्रेंड आला आहे. ज्यामध्ये शारीरिक संबंध किंवा प्रेम करण्याची गरज नाही. जपानमधील तरूणांमध्ये 'फ्रेंडशिप मॅरेज' (Friendship Marriage) हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. जाणून घ्या काय आहे 'फ्रेंडशिप मॅरेज'?.

पती-पत्नीमध्ये मैत्री असावी. हे ठीक आहे, पण लग्न केवळ मैत्रीसाठी केले असेल तर हे चित्र पूर्णपणे वेगळे असते. जपानमध्ये अशा लग्नांचा ट्रेंड वाढत आहे. लग्नानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध किंवा प्रेम असावे अशी अट नाही. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, जपानच्या १२४ दशलक्ष लोकसंख्येपैकी एक टक्के लोक 'फ्रेंडशिप मॅरेज' (Friendship Marriage) या प्रकारच्या विवाहाला प्राधान्य देत आहेत.

'फ्रेंडशिप मॅरेज' म्हणजे काय?

फ्रेंडशिप मॅरेज (Friendship Marriage) म्हणजे हे तरुण-तरूणी कायदेशीररित्या पती-पत्नी असतात. पण पती पत्नींप्रमाणे प्रेम किंवा इतर जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. दोघांमध्ये शारीरिक संबंध आवश्यक नसतात. अशा विवाहानंतर जोडपे एकत्र राहू शकतात किंवा वेगळे राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांची इच्छा असल्यास कृत्रिम गर्भाधारनेद्वारे मुले जन्माला घालू शकतात. दोघांनाही दुसऱ्या जोडीदारासोबतही संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना, असा विवाह केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, फ्रेंडशिप मॅरीज म्हणजे समविचारी रूममेट निवडण्यासारखे आहे. अशा लग्नात, जोडीदार घरचा खर्च कसा करायचा, कपडे कोणी धुवायची, साफसफाई आणि इतर कामे कोण करणार, हे ठरवत असतात.

लग्न कसे केले जाते?

रिपोर्ट्सनुसार, जोडपे लग्नाआधी अनेक तास किंवा दिवस एकत्र घालवतात. यादरम्यान दोघेही अनेक गोष्टींवर मोकळेपणाने बोलतात. कोलोरस नावाची एजन्सी ही पहिलीच एजन्सी आहे जी अशा प्रकारचे विवाह आयोजित करत आहे. अहवालानुसार, मार्च २०१५ मध्ये एजन्सी सुरू झाल्यापासून सुमारे ५०० लोकांनी फ्रेंडशिप मॅरेज केली आहेत. यातील अनेक जोडप्यांना मुलेही आहेत. अहवालानुसार, ३२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण या प्रकारच्या लग्नाला प्राधान्य देत आहेत. लग्नानंतरही ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे ते अशा लग्नाला पसंती देत आहेत.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news