लातूर, नांदेडमध्ये मुसळधार; सात मंडळात अतिवृष्टी, 250 गावे कोरडीच | पुढारी

लातूर, नांदेडमध्ये मुसळधार; सात मंडळात अतिवृष्टी, 250 गावे कोरडीच

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात 24 जूनपासून पाऊस सुरू झाला. दोन दिवस सर्वदूर हजेरी लावल्यानंतर शनिवारी केवळ लातूर, नांदेड या दोन जिल्ह्यात दमदार तर बीडमध्ये मध्यम स्वरुपाची हजेरी लावली. यामुळे ७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मात्र, पाच जिल्ह्यातील 250 गावे कोरडीच राहिली.

विभागात अजूनही खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी योग्य ठरेल, असा पाऊस सुरू झालेला नाही. 23 व 24 जून रोजी काही जिल्ह्यात वरुणराजांनी दमदार हजेरी लावली. परंतु, त्यानंतर तुरळक ठिकाणीच पावसाच्या सरी कोसळत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या २४ तासांत विभागात केवळ ८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यात नांदेड, लातूर व बीडमधील ३५ मंडळात ४० मिमी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

लातूरमधील २, नांदेडमधील ५ अशा ७ मंडळात ६५ मिमी. पेक्षा अधिक म्हणजेच, अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परंतु, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, हिंगोलीत अतिशय हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. येथील २०१ मंडळात पावसाचा एक थेंबही बरसलेला नाही.

परभणी जिल्ह्याला पावसाने झोडपले.

शहरासह जिह्यातील काही भागात रविवारी (दि.26) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. रविवारी दिवसभर उन पडलेले होते. पाथरीत रिमझिम पाऊस पडला.

हेही वाचलंत का? 

Back to top button