उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. ”काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरु असतानाच कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे.

देशात कोरोनाचा धोका कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णसंख्या १,८४४ ने वाढून ९४,४२० वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ही ०.२१ टक्के आहे. तसेच दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५.६२ टक्क्यांवर पोहोचला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात आठवडाभरात सुमारे १ लाख नवे रुग्ण आणि १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याआधीच्या दिवशी देशात कोरोनामुळे २५ मृत्यूंची नोंद झाली होती. त्यात सर्वाधिक १० मृत्यू हे केरळमधील होते. दिल्लीत ६, महाराष्ट्रात ४ जणांचा मृत्यू झाला होता.

 हे ही वाचा :

Back to top button