पुणे : आंबेगावच्या पूर्व भागात मेंढपाळांची चार्‍याची चिंता मिटली | पुढारी

पुणे : आंबेगावच्या पूर्व भागात मेंढपाळांची चार्‍याची चिंता मिटली

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने माळरानावर गवत चांगले उगवले आहे. त्यामुळे मेंढपाळांची चार्‍याची चिंता तूर्त मिटली आहे.

शिंदे गटाला मोठा दिलासा : सुप्रीम कोर्टाकडून नरहरी झिरवळ, अजय चौधरी यांना नोटीस, पुढील सुनावणी ११ जुलैला

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात धनगर तसेच स्थानिक मेंढपाळांची संख्या मोठी आहे. गेल्या चार महिन्यांपासून मेंढपाळांना चार्‍याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे मेंढपाळ पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये पावसाने दोन-तीन वेळा चांगली हजेरी लावली. यामुळे डोंगरी भागात तसेच माळरानावर हिरव्या गवताचा चांगला फुटवा झाला आहे. शेळ्या-मेंढ्या, जनावरे या हिरव्या गवतावर ताव मारताना दिसत आहेत.

Alia Bhatt : गुड न्यूज! आलिया-रणबीर होणार आई-बाबा, फोटो केला शेअर

दरम्यान, आतापर्यंत पडलेला पाऊस कमी प्रमाणातच झाला आहे. मेंढपाळांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी या परिसरात पावसाने हजेरी अत्यल्प लावली होती. त्यामुळे लवकरच चाराटंचाईचे संकट निर्माण झाले होते. यंदा चांगला पाऊस पडून चाराटंचाईचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा मेंढपाळांना आहे.

Back to top button