Mayank Agarwal : रोहित शर्मा इंग्‍लंडमधील कसोटी सामन्‍याला मुकणार? 'या' खेळाडूला मिळणार संधी | पुढारी

Mayank Agarwal : रोहित शर्मा इंग्‍लंडमधील कसोटी सामन्‍याला मुकणार? 'या' खेळाडूला मिळणार संधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोरोनाच्‍या विळख्‍यात सापडलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आता इंग्‍लंडमध्‍ये होणार एकमेव एजबेस्टन कसोटी सामन्‍याला मुकण्‍याची शक्‍यता आहे. आता रोहितऐवजी सलामीवीर मयंक अग्रवाल ( Mayank Agarwal ) याला संघात स्‍थान मिळेल, असे मानले जात आहे. तो आज इंग्‍लंडला इंग्‍लंडला रवाना होणार आहे.

बहुप्रतीक्षेत एजबेस्‍टन कसोटी सामना १ जुलै रोजीपासून खेळणार जाणार आहे. मागील वर्षी इंग्‍लंडमधील कसोटी मालिकेतील हा एक सामना आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ने आघाडीवर आहे. ३१ वर्षांचा मयंक अग्रवाल ( Mayank Agarwal )  हा मागील वर्षी झालेल्‍या इंग्‍लंडमधील कसोटी मालिकेत सहभागी नव्‍हता.

कर्णधार रोहित शर्मा यांला कोरोनाची लागण झाली आहे. सध्‍या तो गृह विलगीकरणात आहे. त्‍यामुळे त्‍याचे कसोटी सामन्‍यात खेळण्‍याबाबत अद्‍याप निर्णय झालेला नाही. त्‍यामुळे मयंक याला इंग्‍लंडला बोलविण्‍यात आले आहे. रोहित शर्मा याची कोरोना चाचणी निगेटीव्‍ह आली तर तो कसोटी सामन्‍यात खेळू शकतो, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. मयंक याने एकुण २१ कसोटी सामन्‍यांमध्‍ये ४१.३३ सरकारीने १ हजार ४८८ धावा केल्‍या आहेत. यामध्‍ये चार शतकांचा समावेश आहे.
त्‍याने मार्च २०२१मध्‍ये श्रीलंकेविरोधात शेवटची कसोटी खेळली होती.

बुहराहकडे सोपविण्‍यात येणार कर्णधारपदाची धुरा ?

मयंक आजच इंग्‍लंडला रवाना होणार आहे. रोहित शर्मा पहिल्‍या कसोटी सामना खेळण्‍यास उपलब्‍ध नसल्‍यास टीम इंडियाचे कर्णधार पद कोणाकडे सोपविले जाणार हा प्रश्‍न आहेच. सध्‍या तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्‍याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्‍याचा विचार होवू शकतो. तसेच ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्‍विन यांचीही नावे आघाडीवर आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button