मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सटाण्यात शिवसेनेचा रास्ता रोको | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सटाण्यात शिवसेनेचा रास्ता रोको

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, याचे पडसाद ग्रामीण भागातही उमटायला लागले आहेत. सटाणा शहर शिवसेनेतर्फे बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि.25) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला. यावेळी शिवसैनिकांनी, गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा देत केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

दुपारी शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ हाती फलक घेऊन, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’, ‘शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है…’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुतर्फा विस्कळीत झाली होती. सटाणा पोलिसांनी तत्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी शिवसैनिकांना महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

आंदोलनात माजी शहरप्रमुख दिलीप शेवाळे, राजू जगताप, शेखर परदेशी, विक्रांत पाटील, बाळासाहेब भामरे, गोविंद सोनवणे, रवींद्र सोनवणे, पप्पू शेवाळे, मंगलसिंग जोहरी, विकास सोनवणे, नंदू पनेरू, सागर कर्डिवाल, नंदू सोनवणे, युनूस मुल्ला, पिंटू सोनवणे, किरण मोरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button