Shraddha Kapoor: लव रंजनच्या चित्रपटात श्रद्धा-रणबीरचे इंटिमेट सीन | पुढारी

Shraddha Kapoor: लव रंजनच्या चित्रपटात श्रद्धा-रणबीरचे इंटिमेट सीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) लव रंजनच्या आगामी चित्रपटासाठी बिझी आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, दोघांचे व्हिड[ओ व्हायरल झाले असून हे व्हिड[ओ चित्रपटाच्या शूटिंग संदर्भातील आहेत. दोघांना एकत्र सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Shraddha Kapoor)

श्रद्धा आणि रणबीरने नुकतेच स्पेनमध्ये शूटिंग केले आहे. दोघेही लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या सेटवरून काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये श्रद्धा आणि रणबीर कपूरचे शूटिंग सुरू असल्याचे दिसते. यामध्ये दोघांचे पाण्यातील इंटिमेट सीन्स असल्याची माहिती आहे.

आणखी एका व्हिडिओमध्ये एक महिला कोरिओग्राफर रणबीरला डान्स स्टेप्स शिकवताना दिसते. दुसऱ्या बाजूला श्रद्धा पिवळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये लक्ष देऊन पाहताना दिसतेय. दोन्ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये रणबीर शर्टलेस दिसत आहे.  त्याच्यासोबत श्रद्धादेखील एका तलावात दिसतेय. १४ सेकंदाचे हे फुटेज आहे. हा व्हिडिओ रणबीर कपूर फॅनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका तलावात दोघे एकमेकांजवळ असून रोमँटिक सीन शूट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणबीर-श्रद्धाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या व्हिडिओवरून असे दिसते की, रणबीर-श्रद्धाचे अनेक रोमँटिक सीन्स या चित्रपटात पाहायला मिळतील.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, लव रंजनच्या या चित्रपटात निर्माते बोनी कपूरदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करतील. चित्रपटात बोनी हे रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यात रणबीरच्या आईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया साकारत आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट पुढील वर्षी  ८ मार्च, २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

रणबीरही पत्नी आलिया भट्टसोबत त्याचा पुढचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेदेखील वाचा-

videos – ranb.ir5330, ranbirkapoor143_ insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor✨ (@ranbirkapoor143_)

Back to top button