व्यापार्‍यास ठेवीदारांकडून मारहाण : व्हिडीओ व्हायरल

Attack
Attack

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या जात नसल्याने राहुरीतील एका पतसंस्थेत वातावरण चांगलेच तापले आहे. पतसंस्थेची सहाय्यक निबंधक कार्यालयातून चौकशी सुरू असताना एका ठेवीदारांकडून पतसंस्थेच्या संचालक व्यापार्‍यास भरबाजारपेठेत मारहाण केल्याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील बाजारपेठेमध्ये एक मेडिकलसमोर काही जणांनी चर्चा सुरू केली. संबंधित मेडिकल चालक एका पतसंस्थेचा संचालक तर चर्चा करणारे महिला- पुरूष ठेवीदार असल्याचे समजते.

दरम्यान, ठेवी परत मिळत नसल्याने संतापलेल्या महिला व पुरूषांचा वाद विकोपाला गेला. हाणामारी सुरू झाली. व्यापार्‍याच्या मुलाला मारहाण केल्याचे दिसत आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी बाजारपेठेत दिसत होती. या घटनेची राहुरी परिसरात एकच चर्चा सुरु आहे. संबंधित पतसंस्थेमध्ये ठेवीदार व संचालकांचा वाद विकोपाला जात असल्याचे चित्र दिसत आहे. ठेवीदारांनी काही दिवसांपूर्वीच सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते, परंतु अधिकारी व पतसंस्थेच्या संचालकांशी सकारात्मक चर्चा होऊन उपोषण मागे घेण्यात आले होते. यानंतर मारहाणीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news