गायन, व्हायोलीनने रसिक मंत्रमुग्ध; ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’स प्रारंभ | पुढारी

गायन, व्हायोलीनने रसिक मंत्रमुग्ध; ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’स प्रारंभ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय ’9 व्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’स शनिवारी औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले.

महोत्सवाच्या सुरुवातीस राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबलावादन आणि कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. त्यानंतर आमदार शिरोळे, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी, द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक दीपक चैतन्य, मंडळाच्या कोअर कमिटीचे सदस्य समीर महाजन, दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

पिंपरी : बोलावण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मारहाण

त्यानंतर मानसी कुलकर्णी यांनी राग पूर्वीमध्ये ’पिहरवा की बासे’ बंदिश विलंबित झुमरा तालात आणि ‘कगवा बोले मोरी अटरिया’ ही बंदिश तीन तालात सादर केली. त्यांनी सादर केलेल्या ‘पद्मनाभानारायणा’ या अभंगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबलासाथ नीलेश रणदिवे यांनी केली. त्यानंतर यज्ञेश रायकर यांचे व्हायोलीनवादन सादर झाले.

त्यांनी राग तिलक कामोदमध्ये विलंबित झपतालात पं. भीमसेन जोशी यांची ‘तिरथ को सब करे’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंतर मध्यलयात ‘कोयलिया बोले’ यासह स्वरचित बंदिश सादर केली. त्यांना तबलासाथ पांडूरंग पवार यांनी केली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं. श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाला.

हेही वाचा

साडेतीन हजार जणांची झाडाझडती; पुणे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

नगर : फरारी आरोपीस लातूरमध्ये केले जेरबंद

रसिकांना आली पुलंच्या द्रष्टेपणाची प्रचिती

Back to top button