साहेब, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा हो ! जनसंवाद सभेत 127 नागरिकांच्या तक्रारी | पुढारी

साहेब, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा हो ! जनसंवाद सभेत 127 नागरिकांच्या तक्रारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

शहरात सर्वत्र नागरिकांना मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री अंगावर धावून येतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी तक्रार सोमवारी (दि.6) क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केली.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 24, 13 , 7 ,11 , 13 , 14 , 27 आणि 18 असा एकूण 127 नागरिकांनी 150 हून अधिक तक्रारी मांडल्या. शहरातील मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा बंदोबस्त करावा. तक्रारींकडे पशूवैद्यकीय विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही. तसेच, पाळीव प्राण्यांबाबत परवाना असणे गरजेचे आहे. याबाबतच्या कोणत्याही नियमावलीचे पालन न करता प्राणी पाळले जातात. त्यांना प्राणी पालनाबाबातच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात. अशा नागरिकांना दंड करावा, अशी तक्रार सभेत करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड: दिवसाआड पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

शालेय विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी ज्या शाळांच्या जवळ पदपथ आहेत. तेथे रस्ता व पदपथ यांच्यामध्ये संरक्षक जाळी बसवावी. नैसर्गिक नाल्यावर, पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण काढावे. नाले बुजवून अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरू करावेत. पदपथावरील वरील टपर्‍या, बेकायदा पत्राशेड हटवावे.दशक्रिया घाटाची दुरुस्ती करावी. पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावे. मिळकतकर भरण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान करावी. शहरात विद्यार्थांसाठी अभ्यासिका उभाराव्यात, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नियमित पाठवावे, अशा तक्रारींही सभेत करण्यात आल्या. सभेचे अध्यक्षपद सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, उपायुक्त अजय चारठणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

अजित पवारांच्या पिंपरी दौर्‍यामुळे राष्ट्रवादी जोमात; प्रशासकीय राजवटीत महापालिका प्रकल्प उद्धघाटनाचा धडाका

पावसाळ्यापूर्वी रस्ते काम पूर्ण करा

रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे. उद्यानाचे अर्धवट काम पूर्ण करावे. रस्त्यावरील राडारोडा हटवावे. ज्या भागात पाणी साचते तेथील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे गरजेचे असून रस्ते सुशोभिकरणाकडे लक्ष द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Back to top button