पिंपरी-चिंचवड: दिवसाआड पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप | पुढारी

पिंपरी-चिंचवड: दिवसाआड पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पवना धरणात पाणी असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यावरून भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाना साधला. तर, राष्ट्रवादीने प्रशासकाच्या आडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे, अस आरोप भाजपने केला आहे. पाण्यावर दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप रंगला आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी द्या, असे मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

पाच वर्षांत भाजपला महापालिकेत व्यवस्थित काम करता आले नाही. त्यांना शहरासाठी आंद्रा व भामा आरखेड धरण पाणी योजनेतून 267 एमएलडी पाणी आणता आले नाही. त्यामुळे शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेते अजित पवार यांनी भाजपवर केली. चिखली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून राष्ट्रवादीला सत्ता दिल्यास पाणी प्रश्नांसह इतर सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अजित पवारांच्या पिंपरी दौर्‍यामुळे राष्ट्रवादी जोमात; प्रशासकीय राजवटीत महापालिका प्रकल्प उद्धघाटनाचा धडाका

त्यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी प्रत्युतर दिले आहे. एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने 24 बाय 7 तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवून पंधरा वर्ष सत्ता भोगली. त्यांनी नागरिकांना कधीही चोवीस तास पाणी दिले नाही. पालिकेच्या प्रशासकांआडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई दाखवून त्यांचे खापर भाजपवर फोडत आहेत. भाजपने पाच वर्षात आंद्राचे पाणी आणून पाणी प्रश्न सोडविला आहे. भामा-आसखेडचे पाणी आल्यास संपूर्ण शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

माझी वसुंधरा अभियान 2.0: लोणावळा शहराचा राज्यात दुसरा क्रमांक

मात्र, पालिका न डोळ्यासमोर दिसू लागल्याने पालकमंत्र्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रश्न दिसू लागले आहेत. त्यांनी नागरिकांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात शंभर नगरसेवक निवडून देण्याचा दमवजा इशाराही दिला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. भाजपने पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे केली असून, शहरात विकासकामांची गंगा आणली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Back to top button