Anusha dandekar : लग्नाआधी आई झाली अनुषा, गोंडस बाळाची झाली ‘गॉडमदर’? | पुढारी

Anusha dandekar : लग्नाआधी आई झाली अनुषा, गोंडस बाळाची झाली 'गॉडमदर'?

पुढारी ऑनलाईन डेस्क

मॉडेल, व्हीजे अनुषा दांडेकर (Anusha dandekar) हिचे अनेक बोल्ड फोटोज आपण सोशल मीडियावर पाहतो. पण, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला अनेक सुंदर फोटोज पाहायला मिळताहेत. हे फोटोज पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल. अनुषा दांडेकर हिने एका चिमुकलीसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. पिंक ड्रेसमधील ही चिमुकली आहे तरी कोण पाहा? (Anusha dandekar)

अनुषा दांडेकर तिच्या ऑफिशिअल अकाऊंटला हे फोटो शेअर केले आहेत. तिने एका छोट्याशा परीसोबत फोटोशूट केले आहेत. तिने एका मागोमाग एक फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय की- ‘I finally have a little girl I can call my own… introducing this Angel of mine, my GOD DAUGHTER Sahara… the ultimate love of my life. Monster and Gangsta and I are going to look after you, spoil you and protect you forever and always! ✨💕✨ I Love you baby girl, your GOD Mummy!’

पण, तिने या फोटोंवर ज्या प्रकारे कॅप्शन लिहिली आहे, त्यावरून सगळ्यांना वाटलं की, तिने मुलगी दत्तक घेतली आहे. सुष्मिता सेनपासून अनेक सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर तिचे अभिनंदन केले. पण आता तिने स्पष्ट केले आहे की तसे नाही! ते मूल कोणाचे आहे हेही तिने सांगितले आहे.

४० वर्षीय अनुषाने इन्स्टाग्राम स्टेटसवर स्पष्ट केले आहे की, ती (सहारा) तिची मुलगी नाही. तिने मुलीला दत्तक घेतलेले नाही. पण ती त्याच्या जिवलग मित्राची मुलगी आहे. अभिनेत्रीने एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मुलगी तिची आई आणि आजीसोबत दिसत आहे. तिने लिहिले, ‘बेबी सहाराची खरी आई जोहा आणि आजी संगीता आंटी आहे. मी गॉडमदर आहे याचा अर्थ, आयुष्यभर जेव्हा माझ्या मित्राला आणि समर्थनाची गरज असेल, तेव्हा मी तिथे असेन. त्यामुळे ती माझ्या मुलीसारखी आहे, पण ती माझी खरी मुलगी नाही.’

हेही वाचा :

Back to top button