बिबट्यानंतर आता पट्टेरी वाघाची दहशत ! क्षणात पाडला कुत्र्याचा फडशा | पुढारी

बिबट्यानंतर आता पट्टेरी वाघाची दहशत ! क्षणात पाडला कुत्र्याचा फडशा

गणोरे : पुढारी वृत्तसेवा

अकोले तालुक्यातील गणोरे येथील अकोले रोडवर दिनेश आहेर यांच्या राहत्या घरा जवळील पडवीत लोखंडी  खिडकीला  बांधलेल्या पाळीव  कुत्र्यावर पट्टेरी वाघाने हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. गणोरे येथील समर्थ नगर मधील आहेर वस्ती मध्ये गणोरे गावठणा जवळील लक्ष्मन रामराव आहेर  याचे गट नं  ११३५ मधील  सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान  पट्टेरी वाघाने दबक्या पावलांनी  येऊन राहत्या घराजवळील उघड्या पडवीत प्रवेश केला.

पडवीत विड्याचे पाने कापत असलेल्या महिलेला  पडवीत पट्टेरी वाघ आल्याची किंचीत जाणिव सुध्या झाली नाही. पडवीत खिडकीला पाळीव इंग्लिश कुत्र  बांधलेले होते. गळ्यातील भोरकडी तोडुन कुत्र्याला जबड्यात पकडुन त्याने समोरच्या घासात  झेप घेऊन गिन्नी गवतातून पसार  झाला.

कोल्हापूर : पूर नियंत्रण तयारीसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम

हा बिबट्या नसुन तीन साडे तीन फुट उंचीचा पट्टेरी वाघ आहे. याच रात्री या पट्टेरी  वाघाचे या भागात तीन ते चार वेळा दर्शन झाल्याने समर्थ नगर परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.या परिसरात पट्टेरी वाघांचा नेहमीच धुमाकूळ चालु असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गणोरे-अकोले रस्त्यावर समर्थ नगर, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे क्रीडांगण परिसरात नेहमीच बिबट्याचा संचार वाढला आहे.या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळी घरा बाहेर पडणं मुश्किल झाले आहे. ग्रामीण भागात वस्तीवर प्रत्येकाच्या घरात सौचालयाची सोय असतेच अस नाही.

पुण्यातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसाठी सेवा; महामंडळाचे पहिल्या टप्प्यात नियोजन

घरापासून दुर अंतरावर सौचालय बांधलेलं असतं.लगवीसाठी किंवा सौचासाठी जावे लागते. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या दहशत आणिआता पट्टेरी वाघ यामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. चार पाच दिवसापूर्वी देवठाणचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोडके यांनी  शाळेच्या मैदानात संचार करत असलेल्या वाघाची काढलेली व्हिडिओ क्लीप ग्रामस्थांनी मोबाईलवर बघीतली आहे.

या परिसरात पट्टेरी वाघांचा नेहमीच धुमाकूळ चालु असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी रात्री साडे अकराच्या च्या दरम्यान  रस्त्यावर पाच पाच बिबटे बसलेले अनेकांनी पाहिले आहे. गणोरे अकोले रोडवर बिबट्या चा वावर वाढला आहे. यामुळे समर्थ नगर परिसरात वनविभागाने पिंजरा लावुन बिबट्यांचा व पट्टेरी वाघाचा  बंदोबस्त करावा अशी मागणी दिनेश आहेर   किरण भालेराव, सुनिल काळे, श्रीकांत आहेर, राहुल आहेर, अनिकेत काळे, संपत दातीर,मंगेश काळे  आदींनी केली आहे.

नाशिक : मनपाचा 24 तास आपत्कालीन कक्ष कार्यरत

 

Back to top button