थरारक शर्यतीत ‘रायफल- अर्जुनची बाजी’, ठरले महाराष्ट्र केसरी मानकरी | पुढारी

थरारक शर्यतीत 'रायफल- अर्जुनची बाजी', ठरले महाराष्ट्र केसरी मानकरी

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील पहिली महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीत वाईचा (जि. सातारा) सचिन चव्हाण यांची रायफल आणि अर्जुन बैलजोडी मानकरी ठरली. कर्जत येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आमदार रोहित पवार यांनी आयोजन केले होते. यामध्ये राज्यभरातून सुमारे 300 बैलगाडी सहभागी झाल्या होत्या. कर्जतमध्ये प्रथमच अशा पद्धतीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये देखील प्रचंड मोठी उत्सुकता स्पर्धेसाठी होती. यामुळे दिवसभर स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
एकूण सदतीस फेर्‍या घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीच्या वेळी द्या बैल गाड्यांना उपस्थित प्रेक्षक आरोळ्या मारून प्रतिसाद देत होते. भिर्र…असे म्हणतात प्रचंड जल्लोष करण्यात येत होता. एक आगळी -वेगळी स्पर्धा पाहण्यास मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. भरून स्थानांमध्ये तहानभूक विसरून हजारो नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.

नाशिक : घरासमोर उभा असलेला दहा टायरचा ट्रक आगीत जळून खाक

यावेळी अंतिम स्पर्धेचा थरार व काळजाचा ठोका चुकवणारी अटीतटीची आणि प्रेक्षकांची डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. यामध्ये प्रथम क्रमांकाची दोन लाख 22 हजार रुपयांचे बक्षीस सचिन चव्हाण यांना मिळाले. त्याची रायफल-अर्जुनची बैलजोडी प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक माळशिरस येथील तांबोळी यांच्या राणा ग्रुपने पटकाविला.

एक लाख 11 हजार रुपये, तर तृतीय क्रमांक 77 हजार 777 रुपये किशोर भिलारे यांनी मिळवले. या सर्वांना स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, झिशान सिद्दीकी यांच्यासह 11 आमदार उपस्थित आहेत.

रत्नागिरी मच्छीमार्केट परिसरात चरस जप्त, दुसऱ्यांदा मोठी कारवाई

या शर्यतीसाठी तीनशेहून अधिक बैलगाडी चालकांनी सहभाग नोंदवला. आदिती तटकरे म्हणाल्या, अशा पद्धतीच्या स्पर्धा राज्य सरकारने घ्याव्यात याबाबत आपण विनंती करू; मात्र यासाठी सर्व आमदारांना मागणी करावी. याशिवाय न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यांमध्ये ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पर्धा भरवल्या जात आहेत.

कर्जत येथील घेण्यात आलेली स्पर्धा अतिशय देखणी होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करावे, आम्हाला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करावे, असे मंत्री तटकरे म्हणाल्या. रोहित पवार म्हणाले, अशा पद्धतीच्या स्पर्धांना राज्य सरकारने मदत करावी.

91 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत सोमवारी

Back to top button