रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांचा चाकू हल्ला; एकजण किरकोळ जखमी

File Photo
File Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कार चोरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना पाठलाग करणाऱ्या पोलिस पथकावर चोरट्यांनी हल्ला केला. ही घटना मध्यरात्री पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे घडली.  प्रदीप गुट्टे (वय ३१) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप गुट्टे आणि त्यांचे सहकारी एन. आर. काळे हे दोघेजण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्यासोबत रात्रगस्त ड्युटी करीत होते. दरम्यान ते चिखलीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडे जात असताना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात त्यांच्या गाडीला एकाने हात केला.

त्याने आपली कार घेऊन चोरटे मुंबईच्या दिशेने गेल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी वायरलेसवर कॉल देऊन सोमाटने फाटा येथे कार अडविली. त्यावेळी कारमधील चोरट्यांना पोलिसांनी बाहेर येण्यास सांगितले असता त्यांनी गुट्टे यांच्यावर चाकूने वार केला. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांवर झडप घातली. यामध्ये गुट्टे यांच्या बोटाला दुखापत झाली आहे.

शेवटी चोरटे अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून वरिष्ठ निरीक्षक जोगदंड यांनी चोरट्यांवर पिस्तोल रोखले. त्यावेळी चोरट्यांनी कार आणि मोबाइल जागेवर सोडून डोंगरात पळ काढला. पोलिसांनी डोंगर परिसरात शोधाशोध केली. मात्र, चोरटे मिळून आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट देत पथकातील पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news