बालनाट्य कलाकृती निर्माण करायला हव्यात; अभिनेते अजिंक्य जोशी यांचे मत | पुढारी

बालनाट्य कलाकृती निर्माण करायला हव्यात; अभिनेते अजिंक्य जोशी यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘मुलांना घेऊन बालनाट्यासारख्या कलाकृती निर्माण करायला हव्यात. लहान मुलांना घेऊन बालनाट्यांची अधिकाधिक निर्मिती करावी,’ असे आवाहन अभिनेते अजिंक्य जोशी यांनी शुक्रवारी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात जोशी यांनी विविध विषयांवर विचार मांडले.

या निमित्ताने ‘राजा सिंह’ या महाबालनाट्यासंदर्भात दिग्दर्शक केतन क्षीरसागर, निर्मात्या पूजा बावडेकर आणि संगीत संयोजक मयूरेश मडगावकर यांनीही संवाद साधला. संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘सध्याच्या काळात नाटकांचे चांगले प्रयोग होत असून, ते आणखी व्हायला हवेत.

’ क्षीरसागर म्हणाले, ‘बालरंगभूमीवर काहीतरी वेगळे करायचे ठरविले आणि आम्ही या महाबालनाट्याची निर्मिती केली.’ संघाचे सरचिटणीस सुजित तांबडे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा 

‘धर्मादाय’ची बनावट नियुक्तीपत्रे आरोग्य सेवकपदावरील निवडीबाबत तिघांना मिळाली पत्रे

जि. प. मधील रखडलेली पदभरती कधी?

बिबट्यानंतर आता पट्टेरी वाघाची दहशत ! क्षणात पाडला कुत्र्याचा फडशा

Back to top button