पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून | पुढारी

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा

चारित्र्याच्या संशयावरून व्यसनी पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार शिक्रापूर येथे गुरुवारी (दि. 2) उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी सचिन मधुकर नरवाडे (सध्या रा. फ्लॅट नं.7, तांबे बिल्डींग, बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. सावंगी-अवघडराव, ता. भोकरदन, जि. जालना) यास अटक करण्यात आली आहे.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

कांचन सचिन मधुकर नरवाडे (रा. सावंगी-अवघडराव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मृत कांचन हिचा भाऊ विश्वजीत दादाराव मोरे (रा. मु. देहेड, पो. दानापूर, ता. भोकरदन) यांनी फिर्याद दिली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप-सेनेत काटाजोड लढत अटळ

कांचन हिचा विवाह सचिन नरवाडे यांचेशी सन 2015 मध्ये झाला होता. ते बजरंगवाडी शिक्रापूर येथे त्यांचा मुलगा सौरव (वय 6) याचेसह राहण्यास होते. सचिन यांना दारू पिण्याची व पत्ते खेळण्याची सवय होती. त्यामुळे कांचन व सचिन यांचेमध्ये नेहमीच भांडणे होत असत. बऱ्याच वेळा त्याने तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. तसेच कांचन हिच्या चारित्र्यावर आरोपी संशय घेत होता. तिचे इतरांसोबत संबंध असल्याबाबत संशय घेत असल्याने भांडणे होत होती. प्रत्येकवेळी माहेरचे लोक त्यांच्यामध्ये समझोता करून कांचन हिला नांदण्यासाठी पाठवित होते. तरी देखील आरोपी सचिनच्या वर्तनामध्ये काहीही फरक पडलेला नव्हता.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

गुरुवारी कांचन हिचा आरोपीने खुन केला. त्यांचा मुलगा सौरव याने ”पप्पा आणि मम्मी यांचे सकाळी भांडण झाले होते. भांडणानंतर पप्पांनी मम्मीचा शर्टने गळा आवळला होता, असे सांगितले आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे हे करत आहेत.

Back to top button