गडचिरोली: टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच ठार | पुढारी

गडचिरोली: टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच ठार

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : टिप्परच्या चाकाखाली दुचाकी येऊन झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.३१) सकाळी ९ च्या सुमारास चामोर्शी-आष्टी मार्गावरील अड्याळ येथील बसथांब्यानजीक घडली. रोहित कालिदास मडावी (वय २०, रा. येणापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर बालाजी शांतलवार (रा.येणापूर) हा जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,  चामोर्शीकडून आष्टीकडे गिट्टी भरलेला टिप्पर जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलने टिप्परला धडक दिली. यात मोटारसायकलवर मागे बसलेला रोहित मडावी जागीच ठार झाला, तर बालाजी शांतलवार जखमी झाला. आष्टी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button