Tendulkar plyaing 11 : सचिन तेंडुलकरचा रोहित शर्मा; विराट कोहलीला दणका, प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू

Tendulkar plyaing 11 : सचिन तेंडुलकरचा रोहित शर्मा; विराट कोहलीला दणका, प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स चॅम्पियन बनल्यानंतर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या हंगामातील सर्वोत्कृष्ट टीम निवडली आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करून आपल्या टीममध्ये खेळाडूंना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे सचिनने भारतीय संघाचे भाग असणा-या अनेक दिग्गज खेळाडूंना झटका दिला आहे. यात मुंबईचा रोहित शर्मा आणि आरसीबीचा विराट कोहली यांचा समावेश असून त्यांना आपल्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, सचिनने निवडलेल्या संघाच्या कर्णधारपदी आयपीएल चॅम्पियन हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे. (Tendulkar plyaing 11)

धवन-बटलर सलामी जोडी

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जोस बटलरबरोबर डाव सुरू करण्यासाठी पंजाब किंग्ज सलामीवीर शिखर धवनची निवड केली आहे. बटलरने 863 धावा वसूल करत ऑरेंज कॅप जिंकली. तर धवनने 460 धावा करून आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. लखनौचा कर्णधार केएल राहुलला फलंदाजीसाठी तिसरे आणि कर्णधार हार्दिक पंड्याला चौथे स्थान दिले आहे. (Tendulkar plyaing 11)

संघात तीन फिनिशर

सचिनने आपल्या संघात तीन सर्वोत्कृष्ट फिनिशर्सची निवड केली आहे. यात डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. कार्तिकचे कौतुक करताना सचिन म्हणाला, 'या हंगामात कार्तिकने विलक्षण सातत्य दाखवले. तो शांत आणि नियंत्रित दिसला. जेव्हा एखादा फलंदाज शांत असतो आणि त्याच्याकडे 360 खेळण्याची क्षमता असते, तेव्हा तो धोकादायक बनतो आणि या हंगामात दिनेश कार्तिकने असेच केले.' (Tendulkar plyaing 11)

परदेशी वेगवान गोलंदाजाचा नो एन्ट्री

सचिन तेंडुलकरच्या संघात दोन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह आहेत. यासह, त्याने युझवेंद्र चहल आणि रशीद खान या दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. सचिन म्हणाला की, बरेच तरुण वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेटमध्ये येत आहेत. त्याचे प्रदर्शन खूपच शानदार राहिले. पण बुमराहची जागा मिळवण्यासाठी या तरुण वेगवान गोलंदाजांना अधिकाधिक चांगली कामगिरी करावी लागेल.

सचिन तेंडुलकरची सर्वोत्कृष्ट आयपीएल 2022 प्लेईंग इलेव्हन पुढील प्रमाणे आहे…

जोस बटलर, शिखर धवन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रशीद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news