बीड : महामार्गावर रात्रीच्या वेळी साहित्‍य ठेवून प्रवाशांची लुटमार करणारी टाेळी गजाआड | पुढारी

बीड : महामार्गावर रात्रीच्या वेळी साहित्‍य ठेवून प्रवाशांची लुटमार करणारी टाेळी गजाआड

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करणारी टाेळी पाेलिसांनी गजाआड केली आहे. ही टाेळी महामार्गावर साहित्‍य ठेवत असे. त्‍याच्‍या आमिषाने आलेल्‍या वाहन चालकांना शस्‍त्राचा धाक दाखवून लुटत असे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ७ मे राेजी पहाटे चाेरट्यांनी मांजरसुंबा ते अंबाजोगाई महामार्गावर सारणी-सांगवी येथे जॅक ठेवले.कार चालकाने ते जॅक घेण्यासाठी कार थांबविली असता दबा धरुन बसलेले सहा ते सात जणांच्या टोळीने चालकाला व गाडीतील इतर लोकांना मारहाण केली. आणि त्‍यांच्याकडील रोख रक्कम व दागीने लुटले होते. यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२३ मे रोजी मध्यरात्री दीडच्‍या सुमारास मांजरसुंबा ते अंबाजोगाई महामार्गावरही अशाच प्रकारे चाेरी झाली हाेती.  दोन्ही गुह्यांच्‍या स्थानिक गुन्हे शाखेतील पथक तपास करत हाेते. या प्रकरणी  सचिन शिवाजी काळे (वय २४ रा. पारा ता. वाशी), आकाश बापु शिंदे (वय २२ रा. खोमनवाडी शिवार) , रामा लाला शिंदे (वय २३ रा. नांदुरघाट), दादा सरदार शिंदे (वय ४५ रा. नांदुरघाट), बाबा ज्ञानोबा पवार (वय २२ रा. चिंचोली ) या चाेरट्यांना अटक करण्‍यात आली आहे. आरोपींनी दोन्ही गुन्हेवेगवेळ्या साथीदारसह केली असल्याची कबुली दिली आहे. या आरोपींवर यापूर्वी चोरी, दरोडा, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड आणि उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत. या चाेरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा 

Back to top button