कंगना राणावतचा ‘धाकड’ बॉक्‍स ऑफिसवर ठरला ‘महाफ्‍लॉप’! आठव्‍या दिवशी केवळ २० तिकिटांची विक्री | पुढारी

कंगना राणावतचा 'धाकड' बॉक्‍स ऑफिसवर ठरला 'महाफ्‍लॉप'! आठव्‍या दिवशी केवळ २० तिकिटांची विक्री

पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणावतचा ‘धाकड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर महाफ्‍लॉप ठरला आहे. हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित झाला हाेता. मात्र पहिल्‍या दिवशीच ताे बाॅक्‍स ऑफिसवर आपटला. ‘महाफ्‍लॉप’ ठरलेल्‍या या चित्रपटाची आठव्या दिवशी केवळ २० तिकिटे विकली गेली. त्‍याने ४ हजार ४२० रुपयांची कमाई केली.

कंगना राणावतचा ‘धाकड’ बराेबरच अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘भूल भुलैया २’ (Bhool Bhulaiyaa 2) रिलीज झाला हाेता. त्यामुळे ‘धाकड’ ला ‘भूल भुलैया २’ ने जोरदार टक्कर दिली. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५५.९६ कोटींची कमाई केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच बाॅक्‍स ऑफिसवर आपटला. अआठव्‍या दिवशी या चित्रपटाची फक्त २० तिकिटे विकली गेल्‍याने ४ हजार ४२० रुपयांची कमाई झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ३ कोटी रुपये कमाई केली गेली आहे चित्रपटाच्या निर्मितीस सुमारे ८० ते ९० कोटी रुपये खर्च आला आहे. या सगळ्यावरून कंगनाचा हा चित्रपट महाफ्लॉप झाल्याचे स्‍पष्‍ट हाेत असल्‍याचे मत मनाेरंजन क्षेत्रातील आर्थिक विश्‍लेषक मानत आहेत.

‘ओटीटी’नेही चित्रपटाकडे फिरवली पाठ

कंगना स्वत:  चित्रपटाचे राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. पण कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म  चित्रपटाचे हक्क विकत घेण्यास तयारी दर्शविलेली नाही.

‘धाकड’ या चित्रपटात कंगनासोबत बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु, कार्तिकचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट येताच चाहत्यांनी त्याला पंसती दर्शविली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button