केतकी चितळेला दिलासा नाही, ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

केतकी चितळेला दिलासा नाही, ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिने या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान, केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकीलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय देत केतकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. केतकीवर दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे तिचा जामीन नामंजूर करण्यात येत असल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button