Amnesty Report : जगभरात दोन वर्षात 579 गुन्हेगारांना फाशी; इराणमध्ये सर्वाधिक 314 जणांना मृत्यूदंड

Amnesty Report : जगभरात दोन वर्षात 579 गुन्हेगारांना फाशी; इराणमध्ये सर्वाधिक 314 जणांना मृत्यूदंड
Published on
Updated on

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल (Amnesty Report) या संस्थेच्या अहवालानुसार गत दोन वर्षांत जगभरात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा (Death penalty) सुनावण्यात 20 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये 39 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये जगभरात 2052 गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यातील 579 गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. यात आशियातील इराण (Iran) या देशात सर्वाधिक 314 जणांना फाशी देण्यातआली आहे.

2020 मध्ये जगभरात एकूण 1477 गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती तर त्यापैकी 483 गुन्हेगारांना फाशी दिली गेली होती. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty Report) याबाबतचा 66 पानांचा ताजा अहवाल नुकताच समोर आला आहे. ही संघटना जगभरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतचा डेटा गोळा करत असते. अ‍ॅम्नेस्टीच्या अंदाजानुसार गतवर्षीच्या अखेरपर्यंत जगभरात किमान 28 हजार 670 गुन्हेगार मृत्युदंडाच्या शिक्षेसह जगत होते.

80 टक्के फाशीची प्रकरणे इराणमध्ये (Amnesty Report)

2021 मध्ये देण्यात आलेल्या एकूण फाशीच्या शिक्षेत 80 टक्के प्रकरणे इराण, इजिप्त (Egypt) आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) या देशांतील आहेत. मृत्युदंडाची शिक्षा सुनावणार्‍या देशांत इराण सर्वात आघाडीवर आहे. 2021 मध्ये इराणमध्ये 314 जणांना फाशी दिली गेली तर 2020 मध्ये इराणमध्ये 246 गुन्हेगारांना फाशी दिली गेली होती. इराण, इजिप्त आणि सौदी अरेबियामध्ये 2022 मध्येही फाशीची शिक्षा देण्यात घट झालेली नाही. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सेक्रेटरी जनरल एग्नेस कॅलामार्ड यांनी सर्व प्रकारच्या प्रकरणात मृत्युदंडाचा निषेध केला आहे.

चीन, उत्तर कोरियाचा डेटा नाही

या अहवालात चीन (China), उत्तर कोरिया (North Korea), व्हिएतनाम (Vietnam) या देशांच्या आकडेवारीचा समावेश नाही. हे देश गुन्हेगारांना फाशी देण्याची किंवा मृत्युदंड देण्याची आकडेवारी जगासाठी उपलब्ध करत नाहीत. तथापि, अ‍ॅम्नेस्टीच्या मते, जगात फाशीची शिक्षा देण्यात चीन सर्वात आघाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news