आयटीमध्ये आऊट सोर्सिंग स्टार्टअपची ‘बूम’ | पुढारी

आयटीमध्ये आऊट सोर्सिंग स्टार्टअपची ‘बूम’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचे सावट, देशांमधील युद्ध आणि आर्थिक मंदी यामुळे आयटी क्षेत्रातील बाहेरच्या देशातील आऊट सोर्सिंग बंद झाले असल्याने आयटीयन्सने स्वतःचे स्टार्टअप सुरू करून किंवा दोघा-तिघांत प्रोजेक्ट कोडिंग-डिकोडिंगची कामे घेण्यास सुरुवात केली असल्याने देशविदेशात होणारे आऊट सोर्सिंग शहरातल्या शहरात होत आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर त्याचा परिणाम प्रत्येक देशाला भोगावा लागला होता. अनेक देशांची अवस्था बिकट झाली होती. त्यात आयटी क्षेत्राचे विस्तारलेले जाळे विस्कळीत होण्याच्या मार्गावर असताना वर्कफ्रॉम होममुळे आयटी क्षेत्र सावरले गेले.

औरंगाबाद : पुंडलिकनगरात पती-पत्नीची गळा चिरून हत्या, बेपत्ता मुलाचा शाेध सुरु

गेल्या एक वर्षात रशिया – युक्रेन युद्ध, काही देशातील आर्थिक कोंडी यामुळे भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी त्यांचे बाहेरील देशांत होणारे आऊट सोर्सिंग बंद केले. त्यामुळे आता कोणताही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या कोडींग-डिकोडिंगसाठी मोठ्या आयटी कंपन्यांना लहान कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

त्यामुळे अनेक आयटीयन्सने स्वतःचे स्टार्ट अप सुरू करून किंवा दोघा-तिघांत प्रोजेक्ट कोडींग- डिकोडिंगची कामे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना काळात नोकरी गेलेल्यांना संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सातारा : शहीद प्रथमेश पवार यांना साश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप 

पुणे, बेंगलोर, हैदराबाद येथील अनेक मोठ्या कंपन्यांनी रशिया, श्रीलंका, चीन या देशातील आपल्या शाखा बंद केल्या आहेत. अशा विविध क्षेत्रातील प्रोजेक्टसाठी मोठ्या आयटी कंपन्या छोट्या कंपनीला अथवा तीन – चार जणांच्या मुक्त कर्मचार्‍यांना (ग्रुप) कामं देतात. त्यामुळे प्रोजेक्त वेळेत पूर्ण होतोच शिवाय यातून कार्यालयातील कोणताही कर्मचारी गुंतून राहत नाही.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून देशाबाहेरील आऊट सोर्सिंग बंद झाले असून अनेक कंपन्यांनी बाहेरच्या देशातील शाखा बंद केल्या आहेत. त्यामुळे छोट्या कंपन्यांना काम मिळत आहे.
– विनोद तिवारी,
आयटीयन

 

 

कामाचे स्वरूप

मोठ्या कंपन्या बाहेर देशांतील त्यांच्या शाखांना आलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी प्रोजेक्टचा कोडिंग हा भाग इतर शाखांना पाठवत असत. भाग पूर्ण झाला कि तो प्रोजेक्ट भारतात यायचा. त्यानंतर इथली टीम राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण करून देत असत. अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी, युद्ध परिस्थिती यामुळे भारतातल्या भारतात कोडिंग-डिकोडिंग करून प्रोजेक्टपूर्ण केला जात आहे. एखाद्या कॅफेत दिलेल्या दिवसांत रोज 4 – 5 तास एकत्र बसून प्रोजेक्टपूर्ण केले जात आहेत.

आऊट सोर्सिंग

मोठ्या कंपन्यांना सातत्याने विविध देशांतून कामे येत असतात. त्यासाठी प्रत्येक वेळी कोडींगसाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांना गुंतवून ठेवण्यापेक्षा बाहेरील छोट्या कंपन्यांना हे काम दिले जात आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना अजून बाहेरची कामे घेण्यासाठी प्रयत्न करता येतात.

हे ही वाचा :

ज्ञानवापी प्रकरण : आज वाराणसी न्यायालयात आज सुनावणी

Rakhi Sawant Engagement : ड्रामा क्वीन राखीने गुपचुप उरकला साखरपुडा

Back to top button