Rakhi Sawant Engagement : ड्रामा क्वीन राखीने गुपचुप उरकला साखरपुडा | पुढारी

Rakhi Sawant Engagement : ड्रामा क्वीन राखीने गुपचुप उरकला साखरपुडा

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant Engagement) सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. रितेशशी वेगळे झाल्यानंतर आता राखी आदिल खान दुर्रानी (Rakhi Sawant Engagement) ला डेट करत आहे. तिने नुकताच स्पष्ट केलं आहे की, तिचा बॉयफ्रेंड आदिल आहे.  आदिलने तिला प्रपोज केलं होतं. आता असे वृत्त समोर आले आहे की, राखी सावंतने गुपचुप बॉयफ्रेंड आदिलशी साखरपुडा केला आहे.  आता त्‍यांच्‍या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

राखी सावंतचा झाला साखरपुडा?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये राखी सावंत हिऱ्याची अंगठी दाखवताना दिसते. व्हिडिओमध्ये राखी म्हणते, ‘ही प्रसिद्धी नाही आणि ते माझे प्रेम आहे’. यानंतर ती कॅमेऱ्यासमोर तिची अंगठी दाखवते. ती पुढे म्हणते, ‘मला कोणाला सांगायचे नव्हते, पण आता सांगत आहे’.

रितेशसोबतचे पहिले लग्न मोडले

राखी सावंतने संभाषणादरम्यान एंगेजमेंट आणि बॉयफ्रेंडचे नाव घेतले नसले तरी तिचा हा मुद्दा नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीकडे जात आहे. राखी सावंतने ‘बिग बॉस-१५’मध्ये पती रितेशची ओळख करून दिली होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. ‘बिग बॉस-१५’ मधून बाहेर आल्यानंतर राखी सावंतने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीय होती की, ती आणि रितेश आता एकत्र नाहीत.

बॉयफ्रेंडच्या घरात गोंधळ

राखी सावंतने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, रितेशपासून वेगळे झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आदिल खान दुर्रानीने तिला यातून बाहेर येण्यास मदत केली. राखीने सांगितले की, आदिलने तिला प्रपोज केले होते.  आदिलच्या कुटुंबाचा त्यांच्या नात्याला विरोध आहे. राखीने सांगितले की, जेव्हा आदिलच्या कुटुंबीयांना आमच्या नात्याबद्दल कळाले तेव्हा त्याच्या घरात खूप गोंधळ झाला. त्याच्या घरच्यांना माझा पेहराव आवडत नाही; पण त्यांच्यासाठी मी स्वतःला बदलायला तयार आहे.

हेदेखील वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Back to top button