नाशिक : नवरदेवाच्या गाडीवर बळीराजाचा साज | पुढारी

नाशिक : नवरदेवाच्या गाडीवर बळीराजाचा साज

नाशिक (वडेल) : पुढारी वृत्तसेवा
विवाहानंतर वधूला सासरी आणण्यासाठीच्या वाहनावर करण्यात आलेला बळीराजाचा साज जिल्ह्यासह (ता. मालेगाव) परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे. शेतकर्‍यांप्रति असलेला जिव्हाळा यानिमित्ताने नवरदेवाने अधोरेखित केला आहे.

सध्या शेतकरी वराला वधू शोधमोहिमेत दिव्यातून जावे लागत आहे. त्याला वधू मिळणे कठीण जात असले तरीही शेतकरी असल्याचा अभिमान हा त्याला असतोच. त्यामुळे तो खर्चात कधीही काटकसर करत नाही, त्याला हवी ती हौसमौज तो करतोच. परिस्थिती कशीही असली तरीही शेतकरी असल्याचा अभिमान बाळगणारे तरुण कौतुकास पात्र ठरत आहेत. पूर्वी नवरदेवाच्या वाहनावर चित्रपटांची नावे अन् प्रसिद्ध कवितांच्या ओळी आदी थर्माकॉलवर चिपकवण्यात येऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत असे. परंतु, आता बदलत्या काळानुसार शेतकरीपुत्र वाहनावर मातीच्या किंवा फायबर बैलजोडी, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि पुढे मी शेतकरी यासह विविध फुलांनी आरास करू लागले आहेत. त्यामुळे नवरदेवाच्या गाडीवरला हा बळीराजाचा साज सर्वांचेचे लक्ष वेधतो आहे.

शेतकर्‍याच्या जीवनात चढउतार राहणारच. विवाह हा आनंदाचा क्षण असून, यात हौसमौज झाली तरच आनंद मिळतो. या उद्देशाने मी शेतकर्‍यांची बैलजोडी, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गाडीच्या अग्रभागी ठेवत तिला फुलांनी सजवितो.
– सागर सातकर,
गाडी चालक, टिपे

हेही वाचा :

Back to top button