लोकर वस्तूविक्रीचे उद्दिष्ट 1 कोटीचे : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार | पुढारी

लोकर वस्तूविक्रीचे उद्दिष्ट 1 कोटीचे : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘लोकर वस्तू विक्री केंद्रातून चालू वर्षी एक कोटीच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवून कामावर लक्ष केंद्रित करावे.  त्यादृष्टीने सर्वांनी सांघिक कामगिरी बजावावी,’ अशी अपेक्षा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

लाल महालप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करा : संभाजी ब्रिगेड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळांतर्गत पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर सुरू करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे शुक्रवारी सकाळी केदार यांच्या हस्ते औंध येथील पशुसंवर्धन मुख्यालयात लोकर वस्तू विक्रीचे उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

धारवाड : साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू, तर १० गंभीर

या वेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे, डॉ. महेश बनसोडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी विक्री केंद्रातील विविध वस्तूंची माहिती घेतली आणि उलाढाल वाढविण्याच्या सूचना दिल्या.

Seema Sachdev Khan : सलमानच्या वहिनीनं सोहेल खानपासून घटस्फोटाआधीच बदललं नाव

लोकर उत्पादने तसेच शेळीचे दूध व पूरक उत्पादनेही या केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कांबळे यांनी या वेळी दिली.

धारवाड : साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू, तर १० गंभीर

लोकर विक्री केंद्रांवरील विविध वस्तूंचे दर पुढीलप्रमाणे आहेत. चादर 1100, सतरंजी 1400 ते 3000, घोंगडी 1200, शाल 700, चेअर कार्पेट 250, पूजा आसन 200, मफलर 200, जेन 950 ते 1500, गादीं 1500 ते 3100, उशी 200 रुपये याप्रमाणे दर असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीतून प्रबोधन

Back to top button