सिंहगड घाट रस्त्यावर ‘क्रॅश बॅरिअर; टेकडीवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना | पुढारी

सिंहगड घाट रस्त्यावर 'क्रॅश बॅरिअर; टेकडीवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आगामी काळात सिंहगडावर पुन्हा ई-बस सेवा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या वतीने सिंहगड घाट रस्त्याच्या बाजूला ‘क्रॅश बॅरिअर’ बसविण्यात येणार आहेत. महामार्गावर गाडी चालविताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळेच जास्त अपघात होत असतात. नियंत्रण सुटल्यावर वाहन थेट रस्ता सोडून खाली जाते. त्यावेळी अशी घटना रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी ‘क्रॅश बॅरिअर’ बसविले आहेत. असे ‘क्रॅश बॅरिअर’ आता सिंहगड घाट रस्त्यालगत बसविण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले तरी आता बस खोल दरीत जाणार नाही.

नव्या 300 गाड्यांमध्ये ‘हिल असिस्टंट’

पीएमपी आता लहान आकाराच्या (7 मीटर लांब) नव्या 300 ई-बस खरेदी करणार आहे. या बसमध्ये टेकडीवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना असणार आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे चालकाला मार्गदर्शन करण्यासाठी अत्याधुनिक ‘हिल असिस्टंट’ प्रणाली असणार आहे.

पीएमपी, वनविभाग आणि पीडब्ल्यूडीची नुकतीच बैठक झाली. यात सिंहगड घाट रस्त्यावर क्रॅश बॅरिअर, रस्ता रुंदीकरण, वळणावर मोठे मिरर अशा विविध उपाययोजना करावयाच्या आहेत.
लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

हेही वाचा :

Back to top button