नाशिक : सिडकोत मोटारसायकल, मोबाइल चोरट्यांना अटक | पुढारी

नाशिक : सिडकोत मोटारसायकल, मोबाइल चोरट्यांना अटक

नाशिक (सिडको)  : अंबड पोलिसांनी मोटारसायकल व मोबाइल चोरी करणार्‍या दोघा संशयितांकडून एक लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकनगर येथून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची तक्रार संदीप थापा (रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) यांनी दिली होती.

संशयितांबाबत पोलिस शिपाई गांगुर्डे यांना खबर मिळाली असता, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे व गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी संशयित संदीप समाधान गवई (19, रा. मटाले चाळ, मनपा शाळेजवळ, बंदावणेनगर, कामटवाडा), दर्शन नागो निकुम (22, रा. जोगेश्वरी अर्पाटमेंट, उत्तमनगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन चोरीचे मोबाइल, मुंबई नाका व गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील तपास पोलिस नाईक बनतोडे व शिपाई कातकडे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button