सांगली : टेंभूच्या पाण्याअभावी पिके वाळू लागली | पुढारी

सांगली : टेंभूच्या पाण्याअभावी पिके वाळू लागली

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात टेंभू आवर्तन सुरू केले. परंतु अद्याप या भागाला पाणी सोडण्यात आले नाही. कडेगाव तालुक्यात पश्चिम भागात असणार्‍या नेर्लीसह परिसरातील गावात टेंभूच्या पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

उसासह अन्य भाजीपाला पिके वाळू लागल्याने शेतकरी आक्रमक बनला असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. टेंभू विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पाणी पातळी खालावल्याने शेतीच्या पाण्याची शेतकर्‍यांना मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टेंभूचे आर्वतन सुरू करण्याची मागणी गेल्या महिन्यापासून शेतकर्‍यांतून होत होती.

तालुक्यात सध्या पाण्याअभावी नदी, बंधारे, ओढे ओस पडू लागले आहेत. पाण्याअभावी ऊस, पिके वाळू लागली आहेत. सध्या ऊस तोडणी सुरू असून पाण्याअभावी वजनात तूट येत आहे. टेंभूचे पाणी या भागातील शेतकर्‍यांसाठी लवकरात लवकर सोडावे, अन्यथा टेंभूच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button