आजचे राशिभविष्य (दि. ९ मे २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ९ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष-मानसिकता बदलण्याची गरज. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. संवादाने प्रश्न सोडवण्याची गरज. अनावश्यक भीतीमुळे नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ-आप्तेष्टांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. ठरवलेल्या कामांत यश मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक उन्नती होईल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन-दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल. कामांत अडचणी येतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. व्यावहारिक सावधानता गरजेची.
राशिभविष्य
कर्क

कर्क- प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे राहाल. मित्रमंडळींबरोबरचे संबंध द़ृढ होतील. मनासारख्या घटना घडतील.

सिंह

सिंह- मनःस्ताप होईल. मनातील कल्पित संशय अस्वस्थता निर्माण करेल. प्रेमभाव, करुणा महत्त्वाची आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या

कन्या- व्यावसायिक प्रगती होईल. योग्य मार्गाने वाटचाल कराल. मित्रमंडळींसाठी वेळ द्याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
राशिभविष्य
तुळ

तूळ- कार्यसिद्धी योग. जबाबदारी वाढेल. पदोन्नतीचे योग. अशक्य काम शक्य कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक-अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार दप्तरी दंड भरावा लागू शकतो.
राशिभविष्य
धनु

धनु-मदत करूनही एखादी व्यक्ती कृतघ्नपणा करेल. भावनाप्रधान व्हाल. दम्यासारखे जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडवणारा दिवस.
राशिभविष्य
मकर

मकर-सगळ्या मनासारख्या घटना घडतील. यशाकडे वाटचाल कराल. आपापसामध्ये सामंजस्य निर्माण होईल. मान-सन्मान मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ-खर्‍याअर्थाने दिवस सार्थकी लागेल. जुने येणे वसूल होईल. लाभदायक दिवस. कामाची जबाबदारी वाढेल. सौख्यकारक दिवस.

मीन

मीन-गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. सट्टा लॉटरी शेअर्समधे नुकसान होण्याची शक्यता. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल.

राशिभविष्य

Back to top button