औरंगाबादेत ‘राज’सभेच्या मैदानावरच ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा | पुढारी

औरंगाबादेत ‘राज’सभेच्या मैदानावरच ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विक्रमी सभा घेतली होती. आता त्याच मैदानावर ८ जून रोजी शिवसेनेचे पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

आतापर्यंत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेच्या सभा नेहमीच होतात. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा याच मैदानाने अनुभवल्या आहेत. राज ठाकरे यांनी १ मे रोजी तिथेच सभा घेतली हाेती. आता त्याच ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासाठी मैदान बुक करण्यात आले असून पोलिसांच्या परवानगीसाठीही अर्ज करण्यात आला आहे, असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे सांगितले आहे.

वर्धापन दिन

औरंगाबादच्या शिवसेना शाखेचा ८ जून रोजी ३७ वा वर्धापन दिन आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेता आला नाही. आता कोरोना संसर्ग संपला आहे. शिवाय राज्यात शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात येत आहे, असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे. गर्दी जमविण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आम्हाला गरज नाही. राज ठाकरे यांच्या सभेला जिल्ह्यातील केवळ दोन ते अडीच हजारच लोक होते. बाकी सगळे बाहेरुन आणण्यात आलेले होते, असे खैरे म्हणाले.

हेही वाचा  

Back to top button