पिंपरी : परदेशवारी नको रे बाबा | पुढारी

पिंपरी : परदेशवारी नको रे बाबा

पिंपरी : शशांक तांबे : मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागल्याने सुट्टीत फिरायला जाण्याचे वेध नागरिकांना लागले आहेत. दीड वर्ष कोरोना निर्बध काळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकांना बाहेर जाता आले नाही.

त्यामुळे यावर्षी फिरायला जाण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. देशातच फिरण्यासाठी नागरिक प्राधान्य देत असून परदेशवारीसाठी कमी पर्याय आणि वाढीव खर्च यामुळे नागरिक परदेशवारीसाठी नको म्हणत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्याने ट्रॅव्हल कंपन्यांकडे नागरिकांची विचारणा सुरू झाली असून गेले दीड वर्ष कोरोनामुळे निर्बंध आणि भीती यामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी होता. कोरोना निर्बंध हटल्याने नागरिक भारतातील पर्यटनाला पसंती देत आहेत.

राज ठाकरेंवर आजच योग्य ती कारवाई होईल : पोलीस महासंचालक

सिमला, कुलू मनाली, माउंट अबू, रानीखेत, मेघालय, शिलाँग, सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, कूर्ग, काश्मीर या ठिकाणांना नागरिक पसंती देत आहेत.

परदेशात फिरायला जाण्यासाठी बजेटचा विचार करावा लागत असल्याने नागरिकांनी परदेश वारीचा विचार रद्द केले आहेत. ग्राहक ट्रॅव्हलिंग कंपनीकडे परदेश वारीचा विचार करून येतात परंतु तिकिटाचे दर बघून देशांतगर्त फिरायला पसंती देत आहेत.

कोरोनामुळे अनेक देशांचे निर्बंध हटवले नसल्याने परदेश पर्यटनाचे पर्याय कमी आहेत. त्यात विमानांचे तिकीट आणि डॉलरचे दर यामुळे परदेश वारी महाग झाली आहे. तिकिटांच्या दरात देशांतर्गत पर्यटन होत असून सुरक्षित होत आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने स्वस्त; जाणून घ्या प्रति तोळा दर

रशिया आणि आजूबाजूच्या देशांमध्ये असुरक्षित वातावरण आहे. तर अनेक देशांमध्ये कोरोना बाबत निर्बध आहेत. गेल्या दीड वर्षात नागरिकांचा खर्च वाढला होता. कोरोना काळात अनेक कंपनांनी पगारात कपात केली आहे.

परदेशात प्रवास करताना डॉलरच्या माध्यमातून खर्च करावा लागतो. तर कोणत्याही देशाचे चलन उपलब्ध करायचे झाल्यास त्यासाठी डॉलर वापरावे लागतात. आणि सध्या डॉलरचे भाव आणि रुपयांमध्ये मोठी तफावत असल्याने परदेश वारीचा बेत अनेकांकडून रद्द केला जात आहे.

बुलडाणा : रमजान ईदला गालबोट; बाबनबीरमध्ये ईदगाह मैदानावरच युवकाची हत्या

देशंतर्गत पर्यटन वाढले असून परदेशात जाण्यासाठी बजेट वाढवावे लागत आहे. सिमला, कुलू मनाली, माउंट अबू, रानीखेत, मेघालय, शिलाँग, सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, कूर्ग, काश्मीर या ठिकाणांना नागरिक प्राधान्य देत आहेत.
-ट्रॅव्हल व्यावसायिक

गेली दीड वर्ष नागरिक घरातच होते. त्यामुळे कोकण, गोवा यांना कमी बजेटच्या ठिकाणा पसंती मिळत आहे.
– एक ट्रॅव्हल व्यावसायिक

Back to top button