बुलडाणा : रमजान ईदला गालबोट; बाबनबीरमध्ये ईदगाह मैदानावरच युवकाची हत्या

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस मुस्लीम धर्मियांकडून ईदचा सण साजरा केला जात असताना बाबनबीर (ता. संग्रामपूर) येथे मात्र एका घटनेने गालबोट लागले. नमाज पठणासाठी जमलेल्या दोन मुस्लीम गटांमध्ये वाद झाला; त्यामध्ये एका तरुणाची गुप्तीने भोकसून हत्या करण्यात आली.
मंगळवारी सकाळी बावनबीरच्या ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधव सामुहिक नमाज पठणासाठी एकत्रित आले. त्याचवेळी मुस्लीम समाजाच्या दोन गटांतील जुना वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसान एका तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणाला गुप्तीने भोसकले. शे. रफीक शे गणी (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकाराने उपस्थित सर्वच मुस्लीम समाज बांधव हादरले. या घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचा ठाणेदार गुट्टे यांनी तातडीने घटनास्थळी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या बावनबीर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले.
हे वाचलंत का?
- गडचिरोली : नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक; एक पोलिस जवान जखमी
- पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने ११ लाख ८० हजारांचे अमलीपदार्थ पकडले
- Met Gala २०२२ : नताशा पूनावालाच्या गोल्डन साडीवर खिळल्या नजरा