Akshaya Tritiya 2022 : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने स्वस्त; जाणून घ्या प्रति तोळा दर | पुढारी

Akshaya Tritiya 2022 : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने स्वस्त; जाणून घ्या प्रति तोळा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya 2022) एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. यामुळे सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. दरम्यान, आज सोन्याच्या दरात १,२८० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५१,५१० रुपये होता. तर चांदी ८०० रुपयांनी स्वस्त होऊन ६२,७०० रुपयांवर आली आहे. (gold and silver prices)
गुडरिटर्न्स वेबसाइटच्या (Goodreturns website) माहितीनुसार, २२ कॅरेट सोने १,१९० रुपयांनी स्वस्त होऊन ४७,२०० रुपयांवर आले. दिल्ली आणि मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर बंगळूर, हैदराबाद आणि कोलकाता येथे असलेल्या दराएवढाच आहे. या ठिकाणी १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,५१० रुपये एवढा आहे.

चैन्नईत २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोने ४८,५५० रुपये आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता येथे चांदीचा प्रति किलो दर ६२,७०० रुपये एवढा आहे. चैन्नई, बंगळूर आणि हैदराबाद येथे चांदीचा दर ६७,६०० रुपये आहे. (Akshaya Tritiya 2022)
दरम्यान, इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल सोमवारी (दि.२) शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,३३६ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर चांदी प्रति किलो ६२,९५० रुपयांवर होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण

फेडरल रिझर्व्हद्वारे जलद व्याज दर वाढीच्या शक्यतांमुळे सोमवारी सोन्याच्या किमतीत २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. यामुळे सोने तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १,८६५ डॉलरवर आले आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

Back to top button